जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित कॉलेजचा गणवेश बदलाचा अचानक तालिबानी निर्णय ; विद्यार्थ्यांच्या पालकांसह तालुक्यात तीव्र असंतोष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अचानक आणि तेही शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच गणवेशात बदल करण्याचा तालिबानी निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या पालक वर्गात तसेच तालुक्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

          जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे अध्यक्ष निलेश भोईटे तसेच यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांना आज दि.16 रोजी यावल तालुका भीम आर्मी तर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनीसाठी आपण शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच अचानक गणवेशात बदल करून तालीबानी निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads2"] 

     देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे म्हणणे आहे “बेटी बचाओ बेटी पढाओ” परंतु आपण या घोष वाकयाला “छेद” घातल्याचे वाटते.कारण आपण अचानक गणवेश बदल केल्याने विद्यार्थ्यांना ८०० ते ९०० रूपयाचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच मुलींसाठी पंजाबी ड्रेसकोड न करता सूट पॅन्ट ड्रेस कोड केल्याने आश्चर्य वाटते.

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

त्या प्रमाणे मुलांना पण आर्थिक झळ बसेल.गणवेश ठराविक ठिकाणाहून / दुकानातून किंवा कॉलेजमधूनच घ्यावा अशी अट पण टाकण्यात आली असल्याचे कॉलेज मधील मुला-मुलींस हत्यांच्या पालकात चर्चा आहे आपली ज.जि.मराठा विद्या प्रसारक संस्था जिल्हास्तरीय आहे.जिल्हयात इतर शाळा, कॉलेजमध्ये गणवेश ड्रेसकोड लागू नसतांना फक्त यावलच्या ऐतिहासिक तथा महर्षी व्यासाच्या यावल नगरीत इंग्रजी विदेशी गणवेश,ड्रेसकोड लागू करणे म्हणजे भारतीय संस्कृतीला विसंगत असे आहे.ड्रेस कोड लागू करतांना सर्व स्तरातील मुला, मुलींना गणवेश लागू करून सर्वांसाठी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींसाठी समान नियम लागु करणार आहात का? इत्यादी अनेक प्रश्न यावल शहरासह तालुक्यात उपस्थित होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लागू केलेला ड्रेस कोड (गणवेश) आठ दिवसात रद्द करावा आणि याबाबत आम्हाला खालील स्वाक्षरी करणाऱ्यांना लेखी कळावावे अन्यथा भिम आर्मी संघटने तर्फे आपल्या कॉलेज समोर (फैजपूर रोडवर) आंदोलन छेडले जाईल याची आपण नोंद घ्यावी.असे दिलेल्या निवेदनावर भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रविण बाळु डांबरे सचिन पारधे,अशोक बंडू तायडे.बबलु गनी,रोहीत सोनवणे,निलेश सपकाळे,आकाश बिर्हाडे, सोहन गजरे,करण अडकमोल. यांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!