रावेर/मुबारक तडवी
मोठा वाघोदा बु. तालुका रावेर येथील ग्रामपंचायतला आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा देऊन ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह संवाद साधला व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.[ads id="ads1"]
यावेळी सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी उपसरपंच राहुल काशिनाथ पाटील यांनी सन्माननीय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.[ads id="ads2"]
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, श्री. हरलाल कोळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. राहुल गोपाळ महाजन श्री. प्रवीण त्र्यंबक पाटील, श्री. रविंद्र कडू पाटील, श्री. गोकुळ रामदास महाजन, श्री. दुर्गेश पाटील, श्री. रमाकांत महाजन, यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.



