रावेर येथे आज दि.११ नोहेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजता शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सदस्या माननीय मा. शमीभा पाटील व जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते याप्रसंगी रावेर तालुक्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भातील आंदोलना संदर्भात नियोजन करण्यात आले .फैजपूर प्रांत कार्यालयावर दिनांक 15-11-2022 मंगळवार रोजी मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले.[ads id="ads1"]
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जमीन याचीकेत क्र 2/ 2022 दि 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हाभरात गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही जिल्हाभरात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील 9 गावांमधील 620 अतिक्रमण धारकांना तहसीलदाराच्यावतीने जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली असून पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे.[ads id="ads2"]
सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत राहात असून रहिवासाच्या कामे ती जागा वापरत आहे तसेच हे सर्व अनुसूचित जती -जमाती अल्पसंख्यांक भटके विमुक्त micro ओबीसी या प्रवर्गातील आहेत भूमिहीन कामगार मजूर वर्गातील आहे.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
बैठकीला मार्गदर्शन करतानां शमिभा पाटील यांनी वंचित बहुजन आघडी हि केवळ पोकळ आश्वासन न देता निर्णायक भुमिका घेते यामुळे गेल्या प्रस्थापित राजकारणी व गल्लीबोळातले राष्ट्रीय अध्यक्षांनी धसका घेतला असुन कार्यकर्ता व स्थानिकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करत आहेत तरि, याला बळी पडू नका *हा लढा केवळ इथपर्यंतच लढायचा नसून तो आ. बाळासाहेबांच्या भूमिकेला अनुसरून न्याय मिळेपर्यत कोर्टात जनहित याचिका दाखल करणे. व बाधितानां न्याय मिळवून देईपर्यंत लढणार आहोत असे सांगितले
या गावांमध्ये गेल्या दोन दिवसात शमिभा पाटील व कार्यकर्त्यांनी बैठकी घेऊन लोकांची संवाद साधला असुन. मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे मोर्चा अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शमीभा पाटील राज्य कार्यकारणी सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी तसेच , वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष बाळूभाऊ शिरतुरे, रफिक बॅग शेख याकूब शेख नसीर रतन भालेराव ज्ञानेश्वर तायडे कंदर सिंग बारेला कांतीलाल गाढे देवदत्त मकासरे तडवी मेताब दीपक वाघ प्रवीण हिवरे कैलास कोळी चेतन तायडे गणेश सपकाळे समाधान भिल, राजेंद्र अवसरमल ज्ञानेश्वर कोळी, संदीप सवरणे, समाधान भालेराव राहुल गाढे, नरेंद्र करवले, असे आवाह न संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे . मोर्चा बांधणी व यशस्वीतेसाठी प्रतीक दामोदरे,अजय तायडे, कुलदीप तायडे, अजय भालेराव, सुमित सवरने, निलेश दामोदरे, हे युवा जबाबदारी सांभाळत आहे.
>


