Dharangaon : पिंप्री खु. येथे चोरी; दोन घरे फोडली, सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास ; धरणगाव पोलिस घटनास्थळी दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

धरणगाव : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरी केलेल्या एका घरातून सोने - चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. [ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे, जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील वय - ७३, यांच्या बंद घराच्या कळी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्री. पाटील हे दोन दिवसांपासून दवाखाना करिता बाहेगावी होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. [ads id="ads2"] 

  तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडेराव वय - ३८ हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यांचे घर देखील फोडण्यात आले. परंतू, श्री. खंडेराव यांच्या घरातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि. जिभाऊ पाटील, सहा. फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद , कैलास पाटील , समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!