रावेर तालुक्यातील विवरा खु येथील ग्राम विकास अधिकाऱ्याची मुजोरी ? महितीसाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला पदाधिकाऱ्यांची भीती दखवत लावले हुसकावून ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील विवरा खु येथील ग्रा प चे ग्राम विकास अधिकारी तथा ग्राम विकास अधिकारी तसेच तालुका ग्रामसेवक युनियनचे सचिव अतुल पाटील यांनी आपल्या कार्यलयाकडे आलेल्या माहितीचा अधिकाराच्या अर्जदाराला अवलोकनासाठी पत्र देऊन बोलवले; मात्र माहितीचे अवलोकन करता येऊ नये , म्हणून ग्रा प च्या पदाधिकारी याना कार्यालयात बोलवून अर्जदाराला हुसकावून लावल्याची घटना रावेर तालुक्यातील विवरा खु येथे घडली.  [ads id="ads2"]    

अशी तक्रार अर्जदार शेख नुजमुद्दीन शेख मुनिर यांनी आज या  जनमाहिती अधिकारी तथा ग्राम विकास अधिकाऱ्याच्या गैरवर्तुणुकीविरुद्ध गट विकास अधिकारी प स रावेर यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. श्री अतुल पाटील यांनी विवरा खु येथील १४ वा वित्त आयोगाच्या खर्चात अनियमितता केल्याचा तक्रारदारास संशय आहे, त्यामुळे श्री पाटील माहिती लपवत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे त्यामुळे श्री अतुल पाटील यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी तक्रादार यांनी बी डी ओ यांच्याकडे केली असल्याची माहिती  समोर आलीआहे


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!