"सत्यशोधक" महामानवाच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली - जितेंद्र परदेशी
धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर
धरणगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी जितेंद्र रमेशसिंह परदेशी यांना नुकतेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात साधारणता पंचवीस हजार सक्रिय सभासद असलेली ' महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य ' यांच्यातर्फे दरवर्षी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा व विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हे पारितोषिक दिले जाते.[ads id="ads1"]
धरणगाव येथील जितेंद्र परदेशी यांनी महाविद्यालयात केलेल्या आदर्श कामगीरीबद्दल त्यांना शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आले. याप्रसंगी श्री.परदेशी यांच्या धर्मपत्नी सौ. ममता परदेशी उपस्थित होत्या.
श्री.परदेशी यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, क्रीडा, कला, नाट्य, संगीत आणि शासकीय सेवेत मोलाचे योगदान दिलेले असून आजपावेतो त्यांना अनेक ट्रॉफी व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. [ads id="ads2"]
याअनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीची दखल घेत निवड समितीने त्यांचे कोल्हापूर - जयसिंगपूर येथे अहिल्यामाई होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणराजे होळकर यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी २०२२, हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धरणगाव शहरात वास्तव्यात असलेले जितेंद्र परदेशी यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर शैक्षणीक, सामाजिक, क्रीडा क्षेत्र, व राजकीय मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा


