रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
रावेर तालुक्यातील विटवा, आणि निंभोरा सिम मधला बायपास रस्त्याला तयार करण्यासाठी लगबग दोन वर्षे सुद्धा पूर्ण झालेले नाही .तरीसुद्धा मागील वर्षापासून रस्ता, भयानक रखडलेला आहे.
खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच, (एक्सीडेंट) चे प्रमाण सुद्धा खूप वाढलेले आहेत. रोजच्या रहदारीमुळे लोकांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये, मोटार सायकल सुद्धा व्यवस्थित चालत नाहीत. भरपूर वेळा लोक गाडीवरून खाली पडले ,हात पाय फेक्चर झाले, ठेकेदार ने रस्ता तयार करत असताना रस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात मातीचा थर, तसेच ,बोगस मटरेल वापरलेले आहेत.
त्यामुळे बायपास रस्त्या ने वापरत असताना, लोकांचे मनस्ताप खूप वाढला आहे. लोकांमध्ये प्रश्न? उपस्थित होत आहे. रस्ता खराब तयार करण्यामागे याला जबाबदार (ठेकेदार की बांधकाम विभाग ,किंवा वरिष्ठ अधिकारी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विटवा ते निंभोराशिम बायपास रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा, अशी मागणी समस्त संतप्त नागरिकांकडून होत आहेत.