धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - प.रा.विद्यालय धरणगाव माजी विद्यार्थी तथा पाचोरा येथील एम.एम. कॉलेज मध्ये कार्यरत इंग्रजीचे प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी यांचे नुकतेच " शोभा डेज फिमेल कॅरेक्टर्स: अ सायकोअनालीटीकल स्टटी " हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी यांनी त्यांना धरणगाव पोलीस स्टेशन येथे सन्मानीत केले. [ads id="ads2"]
प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी हे इंग्रजी विषयांमध्ये पी.एच.डी. असून नेट-सेट, टीईटी, सेंट्रल टीईटी या परीक्षा उत्तीर्ण आहेत. हैदराबादच्या इंग्लीश अँड फोरेन लग्वेज युनिव्हर्सिटी या विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन द टीचिंग ऑफ इंग्लिश हा कोर्स उत्तीर्ण असून आतापर्यंत त्यांचे एकूण २५ रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत.