नाशिकला लागले आगीचे ग्रहण , हावडा वरून मुंबईला जाणारी शालिमार एक्सप्रेस मालवाहतूक बोगीने घेतला पेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)  आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शनिवारी नाशिक रोड येथे हावडा वरून मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आली असता अचानक रेल्वेच्या मालवाहतूक भोगीने पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. [ads id="ads1"] 

  आग लागल्याची रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येतात त्यांनीही घटना मोटरमन व स्टेशन मास्तरांना सांगितली. तेव्हा रेल्वे पोलीस नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल होऊन आग विजाविण्यात शर्तीचे प्रयत्न करत होते. या आगेत शालिमार एक्सप्रेस चा भोगीतील लाखो रुपयांचे किमतीचे सामान जळून खाक झाले.[ads id="ads2"] 

      नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्या नंतर प्रवासी उतरत असतानाच ही आग लागली. आगीचे वृत्त समजताच नाशिक महापालिकेचे अग्निशमन दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

सुरुवातीला पॅसेंजर बोगीत धुमसत आग पार्सल डब्यापर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. हे  नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेस येताच ओव्हर हेड वायर तुटून बिघाड झाल्याने ही आग झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.