यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल : तालुक्यातील किनगाव येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या बँक मॅनेजरचा मनमानी कारभार सुरू आहे. ग्राहकांना मूलभूत सुविधा पुरवणे हा बँकेचा नियम असतो,पन किनगाव शाखेचे बँक मॅनेजर हे ग्राहकांना मूलभूत सुविधा पुरवताना दिसून येत नाही. सविस्तर माहिती अशी की,चुंचाळे येथील एका ग्राहकाने SBI सी एस पी सेंटर साठी खाजगी कंपनीकडे एप्लीकेशन फॉर्म सादर केला होता.[ads id="ads1"]
सदर सी एस पी एप्लीकेशन फॉर्म वर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनगाव येथील बँक मॅनेजर यांची सही ची आवश्यकता होती, सदर अर्जदाराने बँकेत जाऊन बँक मॅनेजर यांना विनंती केली पण सदर बँक मॅनेजर यांनी सीएसपी एप्लीकेशन फॉर्मवर सही देण्यास नकार दिला व सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश मिळेल तेव्हाच सही करेल तोपर्यंत सही करता येनार नाही तसेच तुम्ही आमच्या शाखेची तक्रार प्रधानमंत्री कार्यालय यांच्याकडे केली म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की नेवे यांना SBI सीएसपी सेंटर मंजुर करायचे नाही व सीएसपी एप्लीकेशन फॉर्मवर सही करायचे नाही असा आदेश दिला आहे. [ads id="ads2"]
सदर व्यक्तीची SBI सी एस पी सेंटरच्या नावाखाली एका खाजगी कंपनीने फसवणूक केली होती. म्हणून सदर व्यक्तीने फसवणूक झाल्याबाबतची तक्रार राष्ट्रपती सचिवालय व राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.सदर उपाध्यक्ष यांनी ऑनलाइन रित्या आपले सरकार ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली द्वारे नेवे यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली होती सदर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात कडून ऑनलाइन रित्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक जळगाव यांच्याकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करण्यात आली होती पण सदर तक्रारीवर योग्य चौकशी करण्यात आली नाही.
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
उपाध्यक्ष यांनी पुन्हा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा प्रबंधक जळगाव यांना पुन्हा ईमेलवर पत्रव्यवहार करून तक्रारदाराला SBI सी एस पी सेंटर साठी योग्य मार्गदर्शन करून सहकार्य करावे अशी विनंती केली होती पण सदर शाखा प्रबंधक यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर उपाध्यक्ष यांनी अर्जदाराची तक्रार थेट प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली यांच्याकडे सादर केली सदर प्रधानमंत्री कार्यालयाकडून तक्रार भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा मुंबई यांच्याकडे योग्य कारवाईसाठी वर्ग करण्यात आली होती. सदर बँक अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची कुठलीही चौकशी न करता खोटा अहवाल सादर करून प्रधानमंत्री कार्यालय यांच्याकडील दिलेली तक्रार निकाली काढली सदर ग्राहकाला समाधानकारक उत्तर देण्यात आले आहे. असा अहवाल भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी ग्राहकाला पत्रव्यवहार करून सांगितले, बँक अधिकाऱ्यांची हुकूमशाही शासन दरबारी खोटा अहवाल? सादर केल्याचा उपाध्यक्ष यानी आरोप केला आहे. सदर तक्रारीवर योग्य चौकशी न झाल्या मुळे न्याय मिळाला नाही म्हणून अर्जदाराने आपल्या मोठ्या भाऊच्या नावाने SBI सी एस पी सेंटरसाठी पुन्हा नवीन एप्लीकेशन फॉर्म भरून सदर फॉर्मवर किनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या मॅनेजर यांची सहीची आवश्यकता असल्याने ते किनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येथे गेले असता बँक मॅनेजर यांनी सही देण्यास नकार दिला व यापुढे तुम्हाला कधीच SBI सी एस पी सेंटर मिळणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सदर तक्रारदार यांनी जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा उपाध्यक्ष याच्या कडे अशी मागणी केली आहे की किनगाव येथील बँक मॅनेजर यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे.
बँक अधिकाऱ्यांची हुकूमशाही चालणार नाही
ग्राहकांना मानसिक त्रास देणाऱ्या बँक मॅनेजर विरोधात व बँक शाखेत हुकूमशाही दाखवणाऱ्या बँक मॅनेजर विरोधात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नई दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे.



