रावेर तालुक्यातील सांगावे येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा,वीरांगना झलकारीबाई कोरी, व टंट्यामामा भिल्ल जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील सांगवे येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा, वीरांगना झलकारीबाई कोरी व टंट्यामामा भिल्ल या महान क्रांति कारकांची सयुंक्त जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी सर्व प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशअध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच वीरांगना झलकारीबाई कोरी यांच्या प्रतिमेस माजी उपसरपंच सुरेश कोळी यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.[ads id="ads1"] 

 तसेच टंट्यामामा भिल्ल यांच्या प्रतिमेस माजी सरपंच सकूबाई भिल्ल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शिक्षक संघटनेचे रमेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की बिरसा मुंडा एक महान क्रांतिकारक योद्धा होते त्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी शाहिद झाले तसेच मा. मुकुंदभाऊ सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की वीरांगना झलकारीबाईने ब्रिटिश सैन्याशी संघर्ष करत राहिले.[ads id="ads2"] 

 व आपली राणी लक्ष्मीबाईचे प्राणवाचवले तसेच टंट्या भिल्ल यांच्या जिवन चरित्र्यावर बोलताना म्हटले की टंट्या गोरगरीब जनतेचा दाता होता व सावकर, बनिया व जमीनदार यांचा कर्दनकाळ होता याप्रसंगी सूत्रसंचलन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हाअध्यक्ष साहेबराव वानखेड़े यांनी केले तर आभार सुरेश तायड़े यांनी मानले .

याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, सुरेशदादा तायड़े, चंदन बिरहांङे, रमेश सोनवणे,महेंद्र केदारे, कोसगाव सरपंच जय तायड़े, निभोरा सरपंच सचिन महाले, जनक्रांती मोर्चा रावेर तालुका अध्यक्ष साहेबराव सोनार, उपाध्यक्ष श्रीराम कोळी, सदस्य राजू वानखेड़े, बाळु मनुरे, योगेश वानखेड़े, वना कोळी, प्रकाश वानखेड़े, सुपडु वाघ, व जयंती उत्सव समिती अध्यक्ष संदीप कोळी, उपाध्यक्ष राजू भिल्ल, पोलिस पाटील सचिव सुरेशभाऊ तायड़े, भगवान कोळी,खुशाल कोळी, कडु कोळी, अशोकभाऊ कोळी , मधुकर कोळी, विमल भिल्ल,महेंद्र कोळी व गावातील आशासेविका, महिला, तरुण, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!