दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️2022 ची अखेरची 'मन की बात': मोदींनी अटलजींच्या आठवणींना दिला उजाळा; कोरोनापासून खबरदारीची केली सूचना


▪️44 भारतीय स्टार्टअप्सनी 16 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ: जगभरात 930 कंपन्यांनी यंदा 1.46 लाख कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले


▪️भारत जोडो यात्रेला 9 दिवसांचा ब्रेक: 3 जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल प्रवास, पुढचा टप्पा UP

 [ads id="ads1"]  

▪️'ठोको ताली'...सिद्धूच्या सुटकेची तारीख निश्चित: प्रजासत्ताक दिनी 'गुरू' येणार तुरुंगाबाहेर, पंजाब काँग्रेसमधील हालचालींना वेग


▪️तुनिषा आत्महत्या प्रकरण, शिझान खानला 4 दिवसांची कोठडी: शिझानने 15 दिवसांपूर्वी केले होते ब्रेकअप; लव्ह-जिहादचा अँगल नाही


▪️अन्न व औषध द्रव्ये मुख्य परीक्षा: अभ्यासक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध, 200 गुणांसाठी 2 पेपर


▪️शिंदे गटाचे नशीब फुटले!: पुढे काय होते, हे कळेल त्यांना, विजय शिवतारेंच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार


▪️राष्ट्रवादीत अजित पवार यांची घुसमट होतेय: त्यांच्यासारखे उमदे नेतृत्व आमच्यासोबत आल्यास आनंदच - दीपक केसरकरांची खुली ऑफर


▪️'AU'ला प्रत्युत्तर देण्यासाठी 'EU' प्रकरण काढले: बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणावरुन संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर टीका


▪️एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाचे बीज मीच पेरले: विजय शिवतारे यांचा दावा; मविआची रणनीती निवडणुकीच्या आधी ठरली

 [ads id="ads2"]  

▪️खासदार राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप: मला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचे दाऊदशी संबंध; तिला आदित्य ठाकरेंनी पाठिशी घातलं


▪️भारताने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका 2-0 ने जिंकली: श्रेयस-अश्विनची 8व्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी


▪️माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक: मीनल गावस्कर यांनी वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


▪️तेलगू सिनेमातील लोकप्रिय अभिनेते चलपती राव यांचे निधन: वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम


📣 महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च पुण्यात बांधण्यात येणार, एकाच वेळी २००० लोक बसतील एवढी बैठक व्यवस्था करण्यात आली. 


📣 मध्य रेल्वेकडून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तारीकरण आणि इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक राहणार, त्यामुळे 29 डिसेंबरपर्यंत अनेक गाड्या बंद असतील. 


📣 राज्यात सध्या 148 कोरोना रुग्ण सक्रिय, राज्यातील 60 वर्षांवरील तब्बल 71 लाख ज्येष्ठांसह 18 ते 59 वयोगटातील 81 टक्के व्यक्तींनी बुस्टर डोस घेतलेलाच नाही


📣 टाटा मोटर्स जानेवारीमध्ये 2023 ऑटो एक्सपोमध्ये नवीन कार्स लॉंच करणार, हॅरियर फेसलिफ्ट आणि सफारी फेसलिफ्ट येणार ग्राहकांच्या भेटीला


📣 करदात्यांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत असणार मात्र त्यानंतर विलंब शुल्कासह आयटीआर दाखल करावा लागणार


📣 जगातील दुसऱ्या सर्वात मोठया ‘लोणार’ या प्रसिद्ध सरोवराच्या पाण्याच्या पातळीत तब्बल 14 वर्षानंतर मोठी वाढ, अनेक मंदिरे गेली पाण्याखाली

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!