वन कर्मचारी अपूर्ण संख्येमुळे अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत यावल वनक्षेत्रात आडजात व सागवानी लाकडाची जोरदार तस्करी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


लोकप्रतिनिधीचे समर्थकच सातपुडा उजाड करीत आहेत.

यावल दि. 26 ( सुरेश पाटील ) तालुक्यात यावल वन विभागात पूर्व आणि पश्चिम भागात वन कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण संख्येमुळे वनक्षेत्रपालासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत ठराविक लोकप्रतिनिधीचे काही समर्थक आडजात व सागवानी लाकडाची तसेच वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट करीत मोठी तस्करी करीत आहेत. [ads id="ads1"]  

  यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय व निवासस्थानापासून पासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर यावल शहर परिसरात व संपूर्ण वन क्षेत्रात अनधिकृतपणे बिना परवानाधारक आड़जात व सागवानी लाकडाचा गोरख धंदा रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सर्रासपणे करीत आहे. [ads id="ads2"]  

        शनिवार दि.24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर महेलखेड़ी गावच्या स्मशानभूमी जवळ आडजात लाकडाचा साठा अनधिकृत पणे करून ठेवलेला होता ते आडजात लाकूड ट्रक मध्ये भरून बाहेरगावी बिना परवानगीने रवाना करतानाचा व्हिडिओ प्रत्यक्ष घटनास्थळी करण्यात आला आहे.याबाबत वनक्षेत्रपाल यांना माहिती दिली असता कार्यवाही होण्याआधीच लाकडाचा ट्रक त्या ठिकाणाहून पसार झाला.

     आड़जात लाकडाचा व्यवसाय करणारे एका लोकप्रतिनिधीचे खास समर्थक होते आणि आहे व ते यावल शहरातीलच असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.अनधिकृत पणे तसेच बिना परवाना कोणताही लाकडाचा पास नसताना हे लाकडाचे व इतर ठिकाणचे व्यापारी नेहमी अशा प्रकारे आडजात लाकडाची तस्करी करीत आहेत,आडजात लाकडासोबत सागवानी लाकडाची तस्करी सुद्धा केली जात आहे. सागवानी व अर्जात लाकडाचा व्यवसाय करणारी हे काही ठराविक लोकप्रतिनिधीचे कट्टर समर्थक आहेत हे वन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर राजकीय सामाजिक प्रभाव टाकीत सातपुडा उजाड करीत आहे.यांच्यावर कार्यवाही का होत नाही ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

          याच प्रमाणे यावल पूर्व वनक्षेत्रात म्हणजे न्हावी,बोरखेडा मारूळ,फैजपूर,हंबर्डी,हिंगोणा, सांगवी, डोंगरदा,डोंगर कठोरा,वड्री,परसाडे,सातोद कोळवद,यावल,बोरावल,भालशिव,पिप्री परिसरातून तसेच पश्चिम वन क्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात दहिगाव,सौखेडा,हरिपुरा, कोरपावली,महेलखेडी,नायगाव, साकळी,थोरगव्हाण,मनवेल,वाघझिरा,मनुदेवी,आडगाव,किनगाव,चिंचोली,डोणगाव,उटावद, डांभुर्णी,इत्यादी परिसरातून सातपुडा पर्वतातील सागवानी व आडजात लाकडा सह वनसंपत्तीची अनधिकृत तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

            काही ठेकेदारांनी तर विकास कामे व रस्त्यांसाठी तसेच हरिपुरा धरणाजवळ व इतर अनेक ठिकाणी जेसीपी मशीनने सातपुडा पोखरून गौण खनिजाची चोरी केली आहे.वन विभागाचे कोळन्हावी,भुसावळ इत्यादी ठिकाणासह ठीक ठिकाणी तपासणी नाके असताना सातपुड्यातून सागवानी व इतर आडजात लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते कशी? हा प्रश्न उपस्थित होत असला तरी यावल वन विभागात वन कर्मचाऱ्यांची अपूर्ण संख्या असल्याने वनविभागाच्या कामकाजावर मोठा विपरीत परिणाम झाला असल्याचे वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.असे असले तरी यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गस्ती पथकाच्या माध्यमातून ठोस निर्णय व नियोजन करून अनधिकृत पणे सागवानी व आडजात लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

      तसेच दि.24 रोजी महेलखेडी स्मशानभूमी जवळ एका ट्रक मध्ये आडजात लाकुड भरतानाचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्याचा शोध लावून त्यांच्यावर कार्यवाही करावी असे तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!