दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या देशांच्या या वर्षीच्या यादीत भारताने पाचवा क्रमांक पटकाविला, असून पहिल्या क्रमांकावर इटली आहे. 


📣 ICICI बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक केली. 


📣 दिल्ली एनसीआरमध्ये मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत 2 रुपयांची केली वाढ, फुल क्रीम मिल्क प्रति लिटर 66 रुपये, टोन मिल्क 53 रुपये तर डबल टोन मिल्क 57 रुपये प्रति लिटर मिळणार

 [ads id="ads1"]  

📣 अवतार द वे ऑफ वॉटर या सिनेमाने दहा दिवसांत चांगलाच धुमाकूळ घातला असून, लवकरच गाठणार ३०० कोटीचा टप्पा. 


📣 कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. 


📣 एमपीएससी च्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला आहे - निकाल बैठक क्रमांकासह नावाची यादी आणि कट ऑफ मार्क्स संकेतस्थळावर उपलब्ध झाले 


▪️ देशात कोरोनाचा धोका: तज्ज्ञाचा दावा- BF.7 व्हेरिएंटचा प्रभाव भारतात फारसा नाही, पण कोविड नियमांचे पालन आवश्यक


▪️ अर्थमंत्री निर्मला सीतारामन AIIMSमध्ये भरती: प्रायव्हेट वॉर्डात उपचार सुरू, बजेटपूर्व बैठकांचा धडाका सुरू असताना रुग्णालयात

 [ads id="ads2"]  

▪️ उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना अटक: CBIची ICICI बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई; कोचर दाम्पत्याला नुकतीच झाली होती अटक


▪️ मोदींची वीर बाल दिन कार्यक्रमाला हजेरी: गुरू गोविंद सिंग यांच्या वीर सुपुत्रांना वाहिली श्रद्धांजली, बाल कलाकारांचे शबद कीर्तनही ऐकले


▪️ लालूंविरोधात CBI सक्रीय, खटला पुन्हा सुरू: रेल्वेमंत्री असताना प्रकल्पात भ्रष्टाचार; आरोपींमध्ये तेजस्वी, राबडी यांच्यासह दोन मुलींची नावे


▪️ राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन: भाजप म्हटले- पांधींना पक्षातून काढा, त्यांनी अटलजींना इंग्रजांचा गुप्तहेर म्हटले होते


▪️ जगातील 500 प्रभावशाली मुस्लिमांमध्ये महमूद मदनी यांचे नाव: इस्लामिक NGO रॅबिटतर्फे पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित


▪️ आम्हाला सीमावासीयांबाबत शिकवण्याची गरज नाही: ठराव आणू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


▪️ उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी: कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा, विधिमंडळात एकमताने ठराव करुन केंद्राला पाठवा


▪️ अब्दुल सत्तार यांचा 150 कोटींचा घोटाळा: विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप; मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी


▪️ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा: महाविकास आघाडीच्या आमदारांची मागणी; 'श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या'ची घोषणाबाजी


▪️ आरोप होताच अब्दुल सत्तार नॉटरिचेबल: नागपुरातील शासकीय बंगल्यावर शुकशुकाट; पत्रकार परिषदही केली रद्द


▪️ दिग्गज फुटबॉलपटू पेलेची प्रकृती नाजूक: रुग्णालयात पोहोचत आहेत मित्र व कुटुंबीय, मुलीने केली भावूक पोस्ट


▪️ 'मैं अटल हूँ'चे पोस्टर रिलीज: अटलजींच्या गेटअपमध्ये दिसले पंकज त्रिपाठी, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!