देशात,विदेशात विखुरलेले विद्यार्थी किनगावात आले एकत्र : २८ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


अपयशाला घाबरू नये,संकटाला तोंड देऊन यशस्वी मार्ग काढावा ही गुरूंची शिकवण जीवनाच्या प्रवासात उपयोगी पडली : अभियंता भाग्यश्री डाके

यावल ( सुरेश पाटील) शालेय शिक्षणात गुरुजनांनी दिलेले मंत्र आत्मसात केल्याने आपल्या जिवनात मिळालेल्या यशाने आपण भारावलो नाही, अपयशात खचलो नाही व अल्पवयात परदेशात आलेल्या संकटावर मात करून स्वत:ला व कुटुंबाला सावरले व आज सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन आयरलँड येथे कार्यरत आहे. तेव्हा ज्या गुरूजणांनी आपणास घडवले त्या गुरूजणांचे ऋण व्यक्त करण्या करीता सात समुद्रापार आपण स्नेहमेळाव्या आलो असे प्रतिपादन आयरलँड स्थित किनगावची विद्यार्थीनी तथा सॉफ्टवेअर इंजिनियर भाग्यश्री ढाके हिने केले. [ads id="ads1"]  

किनगाव ता.यावल येथील नेहेरू विद्यालयाच्या सन १९९४ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी पार पडला तब्बल २८ वर्षांनंतर देश विदेशातुन विद्यार्थी एकत्र आले होते. यात प्रामुख्याने या स्नेहमेळाव्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन आयरलँड येथे कार्यरत असलेली व अनेक संकटावर मात करून आयरलँड येथे स्थिरावलेली भाग्यश्री ढाके ही विदेशातुन खास करून या कार्यक्रमात गुरूजणांच्या सन्मान करण्या करीता उपस्थित झाली होती विदेशात असतांना पतीचे अकाली निधनातुन स्वत:हाला व कुटुंबाला सावरण्याची शक्ती गुरूजणांच्या शिकवणीतुन मिळाल्याचे तीन मनोगतात प्रसंगी सांगीतले. [ads id="ads2"]  

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यध्यापक व्ही.एस. पाटील होते तर प्रमुख उपस्थित तत्कालीन शिक्षक बी.डी. देशमुख, व्ही. बी. पाटील,पी.एन.सुरवाडेर जी.एस.साळुंके, एम.एस.पाटील, डॉ. हिरालाल खंबायत, ए.एफ. पाटील, एन. बी. पाटील, एन. बी. मोरे, जी.एम. महाजन, संजय अहिरे, के. एस. सुरवाडे, प्रदिप भोलाणे, आय.के.बर्डे, आर.एस. सोनवणे सह माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींची उपस्थिती होती या कार्यक्राम मनोगत आर.एस. सोनवणे. बी. डी. देशमुख. व्ही.बी. पाटील. डॉ. हिरालाल खंबायत. अमोल कुवरे, भाग्यश्री ढाके, सुवर्णा पाटील, नथ्थु महाजन. डी.एस. सुरवाडे, रविंद्र ठाकुर आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा प्रस्तावना व सुत्रसंचालन डी.एस. सुरवाडे व रविंद्र ठाकुर यांनी केले तर उपस्थितांचे आभार नथ्थु महाजन यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समीर तडवी, नथ्थु महाजन, अजीत तडवी, नितिन धांडे, शामकांत महाजन, मधुकर लोहार, वसंत सोनार, विठ्ठल पाटील, प्रदिप पाटील, धनराज तेली, रवी वारे, प्रमोद पाटील,प्रदिप महाजन, शेखर पटेल आदींनी परिश्रम घेतले.

आधी फुलणारा वर्ग आता बहरला

२८ वर्षानंतर इयत्ता १० वी चा हा वर्ग पुर्वी फुलायचा मात्र, आता बहरला आहे. पुर्वीचे वर्गातील या विद्यार्थींनी समाजात विविध क्षेत्रात कार्य करतांना आपला एक वेगठा ठसा उमटवला आहे. आज या विद्यार्थ्यांना पाहुन आम्हाला अभिमान वाटतो. क्रिडा शिक्षक म्हणुन अनेक खेळाडू घडवले त्यांचा एक वेगळा आनंद आहे.

बी.डी. देशमुख, माजी क्रिडा शिक्षक,विद्यार्थ्यांमध्ये आपले प्रतिबिंब बघतो.

किनगावच्या नेहेरू विद्यालयात १७ वर्ष ज्ञानदानचे कार्य केले अनेक विद्यार्थी घडवले व आज जेव्हा तुम्हा विद्यार्थ्यांना बघतो तेव्हा त्यांच्यात आपण स्वत:हाचे प्रतिबिंब बघतो समाजातील विविध क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती बघुन आपण केलेल्या कार्याचा अभिमान वाटतो व आज या कार्यक्रमातुन पुन्हा आपल्या त्या बाल विद्यार्थ्यांना बहरलेले बघुन मन भरून आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!