मालकी महसूलची असताना पोलिसांनी केला रस्ता बंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल ( सुरेश पाटील ) यावल महसूलची मालकी असताना यावल येथील पोलीस स्टेशन तसेच जुने तहसील कार्यालय आवारात दुय्यम निबंध कार्यालय (खरेदी- विक्री) कार्यालय आहे व कार्यालयाच्या शेजारी तहसील कार्यालयातील महत्त्वाचे अभिलेख शाखा कक्ष आहे. यावल तालुक्यातील असंख्य नागरिक दररोज दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री व्यवहारासाठी येत असतात.[ads id="ads2"]  

   तसेच ते अभिलेख शाखेकडे व मुद्रांक विक्रेते यांच्याकडे सुद्धा येतात परंतु या रस्त्यावर यावल पोलिसांनी अनधिकृत पणे रस्ता बंद करून टाकल्याने महसूल कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील स्त्री- पुरुष नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.लोक प्रतिनिधींनी व विविध सामाजिक संघटनांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल पोलीस स्टेशन आवारात सार्वजनिक वापराचा रस्ता खुद्द पोलिसांनीच बंद केल्याने तो तात्काळ पूर्ववत सुरू करावा असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!