बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरकुल योजनेच्या रकमेत वाढ करा - रा.यु.काँ.तालुका अध्यक्ष ॲड देवकांत पाटील यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल दि.27(सुरेश पाटील)

बांधकाम साहित्याचे दर वाजवी पेक्षा जास्त वाढल्याने ग्रामीण भागात घरकुल योजनेसाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा विरावली ग्रामपंचायत सदस्य देवकांत पाटील यांनी केली. [ads id="ads1"]  

     ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुल योजनेची लाभाची रक्कमेत वाढ करून मिळणेची मागणी यावल गट विकास अधिकारी पं.स.यावल सौ.मंजुषा गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. 

        तसेच या संदर्भातच संदर्भात सीएमओ कार्यालयालात मेल वर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व ग्राम विकास मंत्री ना.गिरीष महाजन,अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना ईमेल करून महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुल योजनेत मिळणाऱ्या लाभाच्या (रक्कमेत ) अनुदानात वाढ करून मिळावी अशी मागणी केली. [ads id="ads2"]  

            संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात घरकुल योजनेत पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना अंतर्गत लाभाची मिळणारी रक्कम 1 लाख 20 हजाराच्या जवळपास मिळत असते.हीच रक्कम शहरी भागासाठी 2 लाख 70 हजाराच्या जवळपास आहे तरी ग्रामीण भागात व शहरी भागातील ही मोठी तफावत आहे ग्रामीण भागासाठी ही रक्कम 2 लाख 70 हजार किंवा त्यापेक्षा जास्त निधी घरकुलांसाठी उपलब्ध करून मिळावा कारण शहरी भागापेक्षा जास्त खर्च हा ग्रामीण भागात होत असतो दळणवळणाच्या वाहतुकीच्या जास्तीचा खर्च येतो आणि आज वाळू अंदाजे 17 हजार रुपये एक डम्पर प्रमाणे सिमेंट गोणी 350 रुपये प्रमाणे,असारी 6 हजार 200 रुपये क्विंटल असून बांधकाम मजुरी यांचे सर्व दर गगनाला भिडले आहे यामुळे शासनाच्या कमी एस्टीमेंट मध्ये घर बांधणे शक्य नाही शिवाय घर बांधकामा व्यतिरिक्त घराला खिडक्या,दरवाजे,इलेक्ट्रिक वीज फिटिंग,नळ फीटिंग,यासारख्या असंख्य गोष्टी या घरासाठी आवश्यक असतात तरी या तुटपुंज्या घरकुल अनुदाना मध्ये घर बांधणे शक्य होत नसल्याने ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी महाराष्ट्र शासनाने या विषयाची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर पंतप्रधान आवास योजना,रमाई घरकुल योजना,शबरी घरकुल योजना या योजनांच्या अनुदानात वाढ करून महाराष्ट्रातील जनतेस त्यांच्या चांगल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जन हिताचा निर्णय घेतल्यास प्रत्येक लाभार्त्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असे दिलेल्या पत्रात मागणी केली आहे.या पत्राची प्रत माहितीस्तव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार ग्रामीण घरकुल विभागावर नियंत्रण असणारे व अंबलबाजावनी करणारे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग सिडको भवन मजला सी.बी.डी बेलापूर नवी मुंबई.कार्यालय याचेसह रावेर यावल लोकसभेचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांना देखील पत्र पाठवून विधानसभेत याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी करणार असून जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पं.स. यावल.या सर्वांना पत्र व मेल द्वारा मागणी करून लवकरात लवकर ही मागणी मान्य करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युवक तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली ॲड. देवकांत पाटील यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!