भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भुसावळ तालुक्यातील निंभोरा ब्रु येथे जळगाव जिल्हा ग्राहक आयोग यांचे तर्फे ग्राहक जनजागृती अभियान अंतर्गत दि.२७/१२/२०२२ मंगळवार रोजी दुपारी 12 ते 2 वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय पिंप्रीसेकम निभोरा ब्रु.|| (दिपनगर) समोर, ता.भुसावळ जि.जळगाव येथे आयोजित केलेला आहे. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये जळगाव जिल्हा ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्यक्षा श्रीमती पूनम मलिक व सदस्य श्री.सुरेश जाधव, उप पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, प्रकाश सरदार, सरपंच रोहिणी कोलते, उपसरपंच उज्वला तायडे, ग्रामपंचायत सदस्य गुरुजींसिंग चाहेल,उल्हास बोरोले, दिलीप ब-हाटे, यासिनखा पठाण, सिमरजीतसिंग चाहेल, विजय तायडे, विजय मालवीय, छाया साळवे, मीराबाई पवार, पुनम सुरळकर,निर्मला पाटील, प्रतिभा तायडे, कमल भिरुड, उज्वला सपकाळे, शालीनी सूर्यवंशी,ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, शेख शब्बीर इंजिनिअर,सुधीर बेंडाळे, रामचंद्र तायडे,पोलीस पाटील विजय धांडे तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲड.श्री. हेमंत भंगाळे त्याचप्रमाणे प्रबंधक श्री. कैलास बैरागी व ग्राहक आयोगाचे सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, ग्राहक जनजागृती आभियान अंतर्गत कायदे विषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. [ads id="ads2"]
या शिबिरात ग्राहक संरक्षण कायदा - 2019 तसेच ग्राहकांचे हक्क अधिकार या संबंधी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान वंचित बहुजन कंत्राटदार संघटना शाखा दीपनगर व ग्रुप ग्रामपंचायत निंभोरा ब्रु यांनी केले आहे.


