कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. अध्यक्ष स्थानी प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक क शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे, अमळनेरचे शिक्षणाधिकारी विजय पवार, सचिन परदेशी भडगाव, जे.डी.पाटील होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते के. एस. धंधरे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, ग्रंथ, पुष्प गुच्छ देवून गौरविण्यात आले.[ads id="ads2"]
जित्याधिकारी कार्यालय जळगाल येथील अल्प बचत भवन येथे, के. एस. धंधरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन संघनेचे राज्य उपाध्यक्ष गणेशजी काकडे यांनी याप्रसंगी केले.
के. एस. धंधरे यांचे सामाजिक व शैक्षणिक वैचारिक क्षेत्रातील मित्र परिवाराकडून त्यांचेवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.सूत्रसंचलन मुबारक शहा यांनी तर आभार यशराज निकम यांनी केले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी प्रोटान शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.