रावेर शहरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड लांबविली ; रावेर पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील (Raver City) बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 11 हजाराची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर शहरातील जुना सावदा (Old Savda Road,Raver City) रोडवर असलेले माऊली नगर (Mauli Nagar,Raver) येथील भरत सुरेश पाटील (वय-30) हे आपल्या परिवारसह वास्तव्यास आहे. 7 डिसेंबर रोजी त्यांचे घर बंद असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून 11 हजाराची रोकड लांबविली.[ads id="ads2"] 

   हा प्रकार गुरूवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशन चे (Raver Police Station) पोलीस कर्मचारी विष्णू भील हे करीत आहे.

हेही वाचा : रावेर पंचायत समितीतील बहुचर्चित शौचालय घोटाळा प्रकरणात अजून 9 जणांना रावेर पोलिसांनी केली अटक 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!