यामुळे जळगाव जिल्हातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती माजी आमदार अरुण पाटील यांचे पूतणे मंदार पाटील यांनी रावेरात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्थात २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागला होता. माजी आमदार अरूण पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आ. एकनाथ खडसे यांच्या पॅनलतर्फे ऐनवेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन यांच्या पत्नी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रतिस्पर्धी जनाबाई महाजन व राजीव पाटील या दोघा उमेदवारांनी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठींबा दिला होता. [ads id="ads2"]
निवडणूक खर्च न दिल्याने कारवाई…
जनाबाई महाजन यांनी राजकीय खेळी करत ही लढत चुरशीची केली. यात अरूण पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव करून जनाबाई महाजन या विजयी झाल्या होत्या. दरम्यान, नियमानुसार निकाल लागल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च दाखविणे आवश्यक होते. तथापी, अंतीम मुदत उलटून गेल्यानंतर देखील त्यांनी खर्चाचे विवरण दाखल केले नव्हते. या संदर्भात माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती घेऊन यांनी सहकार खात्याकडे दाद मागितली होती.
👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
तीन वर्ष निवडणूक लढविण्यावर असणार बंदी…
या अनुषंगाने जळगाव जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विलास गावडे यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना अपात्र ठरविले आहे. तसेच पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकार संस्थेत निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. या बाबतची माहिती आज (दिनांक २४डिसेंबर २०२२) मंदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. .