याबाबत अधिक माहिती अशी, प्रमोद शेट्टी आई-वडील, पत्नी व मुलांसह मेहरूण (Jalgaon murder) येथे वास्तव्याला होता. गेल्या आठ वर्षांपासून भूषण हा बांभोरी येथील विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. शनिवारी (दि. १०) तो नेहमीप्रमाणे विद्यापीठात कामाला निघून गेला. दिवसभर काम करून सायंकाळी ४ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही. याबाबत पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.[ads id="ads2"]
सोमवारी निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदिराजवळ प्रमोद शेट्टीचा मृतदेह बकऱ्या चारणाऱ्या काही मजुरांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यावेळी मंदिराजवळ प्रमोदची दुचाकी देखील मिळून आली. त्याच्या मानेवर तीक्ष्ण हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. मयत प्रमोदच्या पश्चात आई, वडील, पत्नी मोहिणी, मुलगा तुषार आणि मुलगी श्रध्दा असा परिवार आहे.



