रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि .०९/१२/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले , कर्मवीर भाऊराव पाटील व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या असून आम्ही निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविला.[ads id="ads1"]
तसेच दि. १०/१२/२०२२ रोजी समता सैनिक दलाच्या सैनिकांवर ३०७,३५३ हे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे ते खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे असे निवेदन रावेर तहसिलदारांना देण्यात आले.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , रावेर तालुका नियोजन समिती शरद बगाडे , रावेर तालुका प्रमुख सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक प्रमुख विजय धनगर , तालुका उपप्रमुख अनिल वाघ , रोहित बाविस्कर , जितेंद्र मेढे , किशोर तायडे व इतर कार्यकर्ते निवेदन देते वेळी उपस्थित होते .



