सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. राधेश्याम मुंगमोले, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा निंभोरा यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, सोने तारण कर्ज आणि वाहन कर्ज या विषयी विस्तृत माहिती दिली. [ads id="ads2"]
तसेच आर्थिक गुंतवणूक करताना स्टेट बँक ऑफ इंडिया च्या विविध योजना जसे कि एस. आय. पी., एन. पी. एस. बद्दल माहिती दिली. श्री. सुनील पी. साकलकर, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा, यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक व प्राध्यापाकेतर कर्मचार्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हेमंत एम. बाविस्कर यांनी केले, तर आभार डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. सतिश एन. वैष्णव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी समितीच्या सर्व सदस्यांनी यांनी परिश्रम घेतले.



