ऐनपूर (विनोद हरी कोळी) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागामार्फत कार्यक्रम साजरा करण्यात आला. [ads id="ads1"]
यात प्रा. महेंद्र सोनवणे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याचा आणि साहित्याचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जे. बी. अंजने हे अध्यक्ष होते.[ads id="ads2"]
त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही कविता वाचून दाखविल्या. प्रा. डॉ. रामटेके, प्रा डॉ वैष्णव, प्रा.गवळी,प्रा. इंगळे, प्रा. तायडे, प्रा. उमरीवाड, प्रा. बाविस्कर, प्रा. अक्षय महाजन, प्रा. साळुंखे, प्रा. मुळे तसेच श्री. पुंडलिक पाटील व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आभार डॉ व्ही एन रामटेके यांनी मानले.



.jpg)