नाशिक (मुक्ताराम बागुल) दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी शुक्रवारी सिन्नर मोहदरी घाटात चार चाकी वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात गंगापूर रोडवरच्या एकाच महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी ठार झाले असल्याचे समजत आहे. यामध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक नऊ ऑगस्ट 2022 रोजी शुक्रवारी मित्राच्या लग्नातून परतत असताना मोहदरी घाटातून सिन्नर कडून नाशिकच्या दिशेने भारतावर येत असलेल्या स्विफ्ट कारचा टायर फाटला असल्याचे समजते. तर हेच वाहन विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दुसऱ्या प्लेनला जाऊन एका वाहनाला धडकले. [ads id="ads2"]
ज्या गाडीला धडक बसली त्यातीलही प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्या रुग्णांना त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर यामधील मयतांची नावे अद्याप पर्यंत समजू शकले नसून पोलीस सदर घटनास्थळी दाखल झाले असून अधिक पुढील तपास सुरू आहे.



