11 डिसेंबर 2022 रोजी मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा अंन्विकर यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  

मुक्ताईनगर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) संविधान सन्मान दिवस आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दि.11 डिसेंबर 2022 रविवार रोजी मुक्ताईनगर (जिल्हा - जळगाव) येथील प्रवर्तन चौकात राष्ट्रीय प्रबोधनकार राहूलदादा अनविकर यांचा प्रबोधत्नामक गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

संध्याकाळी ठिक 6 वाजता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

सदर या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीचे मुकेशचंद्र वानखेडे ( मुक्ताईनगर),निरंजन तायडे( रावेर),पंकज पांडव( कुऱ्हा-काकोडा),मोहन बेलदार( अंतुर्ली),शांताराम कोळी, भगवान महाले( बोदवड)यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त जणांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन आ.चंद्रकांत पाटील आणि अभिवादन समितीने केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!