जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार (Jalgaon SP M. Jaykumar) यांनी रावेर तालुक्यातील तीन सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. या संदर्भातील आदेश पारीत करण्यात आले आहेत. रावेर मधील दिवसेंदिवस वाढत असलेले गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर रावेर पोलीस स्टेशनतर्फे (Raver Police Station)गुन्ह्याची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली होती.[ads id="ads1"]
यामध्ये सद्दाम शेख लुकमान ( वय २०); सादीक शेख लुकमान ( वय २३) आणि जावेद शेख लुकमान ( वय २७) या रावेर शहरातील फतेहनगर भागातील रहिवासी असणार्या तिघांच्या विरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आला होता.[ads id="ads2"]
या प्रस्तावानुसार जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक रामकुमार यांनी या तिघ जणांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. रावेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन-पाटील यांनी कळविले आहे.



