रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील( निंबोल) येथील ग्रामपंचायत मध्ये आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने आज दिनांक 9 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी (प्रहार दिव्यांग क्रांती संघटना) यांनी सरपंच ,ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक अपंग दिवस साजरा केला.[ads id="ads1"]
प्रथम अपंग बांधवांना अपंग जागतिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .तसेच निंबोल मधील ग्रामपंचायत मध्ये वेळेवर अपंग बांधवांना 5% निधी मिळवून दिल्याबद्दल सरपंच ग्रामसेवक यांचे आभार प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, श्री सुरेश चिंधू पाटील यांनी व्यक्त केले.[ads id="ads2"]
त्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, श्री विनोद हरी कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अपंग बांधवांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .तसेच दिव्यांग तालुका अध्यक्ष यांनी पंधराव्या वित्त आयोगातून दिव्यांगांसाठी प्रथम( सार्वजनिक वाचनालय) म्हणून देण्यात यावे, अशी तरतूद पंधराव्या वित्त आयोगात अपंगांसाठी आहेत. असे ग्रामसेवक यांना सूचित केले. असता निंबोल येथील ग्रामसेवक M .D पाटील त्यांनी तुमचं स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय तयार झाल्यावर तुम्ही निंबोल गावासाठी सार्वजनिक वाचनालय मंजूर करून आणू शकतात असे उलट सुलट उत्तर दिले. त्यानंतर अपंग यांना वैयक्तिक व्यवसायासाठी (200 स्क्वेअर फुट जागा) ग्रामपंचायतीने मिळवून द्यावी असा जीआर शासनाने दिला आहे
असे ग्रामसेवक यांना सुचित केले. असता 200 स्क्वेअर फुट जागेचा असा कोणता जीआर नाही किंवा ग्रामपंचायत अपंगांना 200 स्क्वेअर फुट जागा देऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आजच्या मीटिंग आढाव्यामध्ये अपंगांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अपंगांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
त्या ठिकाणी उपस्थित प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश चिंधू पाटील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद हरी कोळी प्रहार उपाध्यक्ष शशिकांत पाटील. प्रहार तालुका सचिव भागवत दादा शेलोळे .तालुका संघटक आनंदा कोळी शाखा अध्यक्ष गोपाल कोळी. सहसचिव भारत पाच पोळे. सरपंच पती संजय पाटील. उपसरपंच अशोक पाटील .तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील. ग्रामसेवक एमडी पाटील पत्रकार D P ठाकणे अनिल कोळी .शेख फारुख. रोजगार जिल्हा कोषाध्यक्ष शेख सईद बाळू सोनार. देविदास चांभार मोहम्मद पिंजारी. तसेच इतर अपंग बांधव उपस्थित होते.



