रावेर (समाधान गाढे) नव्या लोकायुक्त विधेयकास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजुरी देऊन विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी रावेर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या शाखे तर्फे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
या निवेदनावर तालुका अध्यक्ष महेशचंद्र पाटील,तालुका प्रचार प्रमुख समाधान गाढे , तालुका संघटक तय्युब तडवी, सहसंघटक पंडित कोळी ,सभासद ,विजय रायमळे, आदी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनंतर केंद्रातील लोकपालच्या धरतीवर प्रभावी सशक्त व अधिकार लोक आयुक्त नियुक्त करण्यासाठीच्या मसुद्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे सरकारने सदर विधेयक स्वीकारलेले आहे.[ads id="ads2"]
सदर विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी तातडीने मंत्री मंडळाची मंजुरी घ्यावी व नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर सदर विधेयक मांडून हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .



