जवळपास ६० ते ७० लोकांनी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला 10 ते १1 टाके बसलेले असून, रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार सुरू आहेत. [ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २७/१२/२०२२ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील बौद्ध वस्तीवर १) ललित सुनील वाणी २) भूषण नेमाडे पूर्ण नाव माहित नाही ३) चेतन सोनवणे ४) प्रशांत सोनवणे ५) हेमंत दिलीप पाटील सर्व राहणार न्हावी. ता. यावल ६) भास्कर चौधरी ७) गणेश उर्फ देवा देवकर राहणार सावदा ता. रावेर ८) कल्पेश पाटील ९) सुनील संतोष चिमणकर १०) पवन सुतार सर्व राहणार कोचुर ता.रावेर ११) भूषण जाधव १२) नीरज झोपे १३) रितेश चौधरी १४) शिवम बाविस्कर राहणार सावदा १५) इंद्रजीत पाटील १६) मयूर भारंबे १७) शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर ता. यावल व त्यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला या हल्ल्यांमध्ये आशुतोष अशोक भालेराव वय २१ वर्ष तसेच रोहित उर्फ बुबा मधुकर लोखंडे वय २० वर्ष दोघे राहणार भालोद हे गंभीर जखमी झाले यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्यामध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाट्या-काठ्यांनी लोखंडी रॉड ने मारहाण करून अनेकांना जखमी केले. यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून हे थांबले नाहीत तर "हे महारडे खूप जास्त मातले आहेत यांना धडा शिकवावा लागेल” अशी जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी लाट्या काठ्यांनी मारहाण केली .यांची मुजोरी इथवरच थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन केले.
आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील कोणत्यातरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे ,उज्वला अशोक भालेराव, संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा वरील आरोपी त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारून सुलभा मधुकर लोखंडे हिचे ब्लाउज पाडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
वरील गुन्ह्या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीतांविरुद्ध र.नं २२४/२०२२ भा.द.वि कलम १४३,१४७,१४८,१४९, ३२६,३२४,३५४,३२३,३३७,५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2016 चे कलम तीन३ (१) ( r)(s) (३) (१) (w) (i) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहे.