जळगाव जिल्हा पोलीस दलात 72 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रेड पोलीस उपनिरीक्षकांवर 12 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर 34 पोलीस नाईक यांना हवालदार पदावर पदोन्नती करण्यात आली. [ads id="ads1"]
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नूतन पोलीस अधीक्षक माननीय श्री एम राजकुमार यांनी वर्षाखेरीस जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस दलात ३० (तीस) वर्ष सेवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर ०३ (तीन) वर्ष सेवा व पोलीस उपनिरीक्षक पदावरील वेतनश्रेणीतील वेतन घेत असलेल्या ७२ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची भेट दिली आहे. [ads id="ads2"]
त्यासोबत जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना सेवा जेष्ठतेनुसार १२ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर व 34 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिलेली आहे. सदरहू पदोन्नत पोलीस अधिकारी अमलदारांचे माननीय पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांचे दालनात पदोन्नती बहल करून फित स्टार लावून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अमलदार यांना पदोन्नती बाबत आनंद वार्ता देण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली माननीय प्रवीण पवार कार्यालय अधीक्षक, योगेश रावते प्रमुख लिपिक, दीपक जाधव वरिष्ठ लिपिक, सुनील निकम वरिष्ठ लिपिक, देविदास बाविस्कर लिपिक, आस्थापना शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांचे सह आस्थापना शाखेतील सर्व मंत्रालय लिपिक यांनी मेहनत घेऊन उत्कृष्ट काम केल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलात अधिकारी अंमलदार यांचे कडून सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.


