रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) अन्यायाच्या विरोधात ग्राहकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन रावेर तहसिल कार्यालयात झालेल्या ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले.प्रत्येक नागरीकांची कोणत्याही स्वरूपात फसवणूक होत असते. या अन्यायाच्या विरोधात ग्राहकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून झालेल्या तहसिल कार्यालयातील कार्यक्रमात बोलतांना केले. [ads id="ads1"]
रावेर येथील तहसील कार्यालयात हा कार्यक्रम झाला . यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील,ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष – ॲड धनराज पाटील.सेवानिवृत्त शिक्षक आर बी महाजन यांनी मनोगत व्यक्त केले . यात ग्राहक संरक्षण कायदयाचा इतिहास तसेच या कायदयाचे बदललेले स्वरुप आणि व्यापकता,ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्य या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. [ads id="ads2"]
यावेळी व्यास पिठावर निवासी नायब तहसिलदार संजय तायडे,पुरवठा निरीक्षक डी के पाटील,ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुनिल महाजन, सदस्य बाळु पाटील, विनोद पाटील, वजनमाप प्रतिनीधी एस आर सुरवाडे यांचे सह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंडळाधिकारी डी एच गवई तर आभार संजय तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा व कार्यालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


