विवरे ( समाधान एम. गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक (Vivare Bk Taluka Raver) येथे शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत गावातील तब्बल 6 ठिकाणी चोरी करून गावात एकच खळबळ उडालीआहे. यामध्ये अंदाजे ५० हजार रुपयाची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. निंभोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरी झाल्याच्या स्थळांची माहिती घेत आहे. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील उटखेडा रोडवरील दारू दुकानाचे मेन गेटचे व दरवाजाची कडी कोंडा तोडून दुकानाच्या गल्ल्यातील अंदाजे सुमारे 37 हजार रुपये दुकानाच्या मागे नामे राहुल आमोदे याच्या घराच्या दरवाज्याची कडी-कोंडा तोडून घरातील सर्व सामान फेकाफेक करून 500 रुपये, रामा पाटील यांच्या घरातून 8 हजार व 2 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने, [ads id="ads2"] तसेच विवरे बुद्रुक येथील मधुकर टेम्पे यांच्या घरातून 22 भार चांदी, रेणुका माता मंदिराची दान पेटी, मधुकर कुंभार यांच्या बंद घराची कडी कोंडा तोडून चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.घटनास्थळी निंभोरा पोलीस दाखल झाले असून,चोरी झालेल्या घटना स्थळांची पाहणी करून सविस्तर माहिती घेत आहे.या घटनेने गावामध्ये एकच मोठी खळबळ उडाली आहे.


