ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे महाराष्ट्राचे लोकनेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या व अँड रोहिणीताई खडसे यांच्या वाढ दिवसा निमीत्त पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे मार्गदर्शन शिबिर सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर ता रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या रोहीणीताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दिंनाक 25/12/2022 रविवार या दिवशी सकाळी 10,00 वाजता घेण्यात आले. [ads id="ads1"]
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनचे संस्थापक प्रा . गोपाल दर्जी सर हे होते या शिबिरात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना प्राध्यापक गोपाल दर्जी सराचे 590 रु चे पोलीस भरती व सरळ सेवा परीक्षा ठोकळा पुस्तक आयोजकांकडून मोफत देण्यात आले आहे तरी या शिबिराचा लाभ सर्व अकरावी पासुनच्या विद्यार्थ्यांनी घेतला अध्यक्षीय भाषणात रोहीणीताई खडसे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आपण अभ्यास ज्या दिशेने करतोय ती दिशा ठरवून घेणे महत्वाचे आहे यापासून तुम्हाला तुमचे ध्येय गाठता येईल प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोपाल दर्जी सर यांनी पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा या बाबतीत उदाहरणं देऊन सखोल असे मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
त्यांनी सांगितले की आम्हाला मंदिर नको मज्जीत नको मात्र एक अभ्यासिका असणे गरजेचे आहे कोण म्हणतो आमच्याकडे क्षमता नाही रक्त सळसळते पाहिजे केंव्हा जेंव्हा राष्ट्रप्रेम जागे होईल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील, रमेश नागराज पाटील, चेअरमन श्रीराम पाटील,निंभोरा सरपंच सचिन महाले,बाळा भालशंकर, सिध्दार्थ तायडे, रविंद्र नाना पाटील, सुनिल कोंडे,हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक भाऊ पाटील यांनी केले सुत्रसंचलन अरविंद महाजन यांनी तर आभार मोहन कचरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व युवा कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आयोजन दिपक संतोषराव पाटील ( पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) व किशोर भगवान पाटील (ग्राम पंचायत सदस्य ऐनपूर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा प्रमुख यांनी केले होते.



