धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर
धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना 'गुणवंत शिक्षक पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य, उपप्राचार्य व गुरुवर्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल [ads id="ads2"] प्राचार्य प्रा.डॉ.के.एम पाटील, मेजर प्रा.ए.डी.वळवी, उपप्राचार्य प्रा.आर.आर.पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, प्रा.व्ही.आर.पाटील, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.एस.आर.अत्तरदे, रितेशजी साळुंखे, राजूभाऊ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देखील व्यक्त करण्यात आल्या.


