ऐनपुर प्रतिनीधी :- विजय एस अवसरमल
तालुक्यातील ऐंनपुर खिर्डी परिसरात धाब्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असून विना परवाना दारू विकली जात असून त्याच ठिकाणी ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी दिली जात आहे.या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. [ads id="ads1"]
तसेच परिसरात अवैध दारू विक्रीला ऊत आला असून यावर अद्यापही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अवैध दारू विक्री व्यवसाय भरभराटीस येत आहे.यामुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार वर्ग व युवक मोठ्या प्रमाणात दारूच्या व्यसनात गुरफटले जात असून अगदी अंग मेहनतीने घाम गाळून कमवलेला पैसा हा काही मिनिटात दारू विक्रेत्यांच्या खिशात जात असून मूलबाळ उपाशी दारुडा मात्र तुपाशी अशी काहीशी विदारक परिस्थिती निर्माण होत असते. [ads id="ads2"]
तसेच या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणावर होणारी अवैध दारू वाहतूक व विक्री ही सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेस पडत असते तर पोलिस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? तसेच यातून सुटका करून घेण्यासाठी परिसरातील किरकोळ व लहान सहान दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र मोठ्या प्रमाणावर धाब्यावर नियमित अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस पोलिस प्रशासन दाखवत नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.तसेच अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतरही कुठलीच कारवाई होत नाही.
या मुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडत आहे.तसेच गल्ली बोळातील छोटे अवैध दारू विक्रेते पोलिसांना दिसून येतात.पण धाब्यावर खुलेआम अवैध दारू विक्री का?दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का?पोलिस प्रशासन या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.


