आबासाहेब राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर : शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा सन्मान हा या वर्षी धरणगाव येथील रहिवाशी राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे. [ads id="ads1"]  

            ग्लोबल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडून देशभरातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डसाठी नामांकन म्हणून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राजेंद्र जगन्नाथ वाघ यांनी त्यांचा 'शैक्षणिक क्षेत्रात बदल करावा' व 'दुर्लक्षित समाज शिक्षणापासून उपेक्षित' ह्या सामाजिक संशोधन यावरील कार्याचा व शोधनिबंध यांच्या परिचयासह नामांकन अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केली. [ads id="ads2"]  

             दि.२८ ते ३० डिसेंबर २०२२ ह्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. वाघ यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व मित्र परिवाराकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!