https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा रावेर तालुक्यांतील आंबेडकरी पक्ष,संघटना यांच्या वतीने निषेध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त समाज बांधव यांचेकडून निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना आज दिनांक 12 डिसेंबर सोमवार रोजी निवेदन देण्यात आले. 

  दिलेल्या निवेदनात दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्याचे मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या सदर वक्तव्याचा निषेध म्हणून दि.10 रोजी पिंपरी चिंचवड येथे आंबेडकरी चळवळीतील तीन कार्यकर्त्यांनी अनुक्रमे 1) मनोज भास्कर घरबडे 2)धनंजय भाऊसाहेब व 3) विजय धर्मा ओव्हळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदविला. [ads id="ads1"] 

  त्यानंतर वरील तिघे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध भा. दं. वि. कलम 307, 120 (ब ),353 अ असे गंभीर स्वरूपाचे कलमे लावून खोटे गुन्हे दाखल करून अटक केलेली आहे. वास्तविक पाहता वरील तिघेही कार्यकर्त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते, त्यांनी कोणताही हल्ला केला नाही, कोणताही कट रचला नाही किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण केला नाही. असे असूनही दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.[ads id="ads2"] 

         त्यामुळे सर्व आंबेडकरी पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त समाज बांधव यांच्या भावना दुखवली गेली असुन सदर प्रकरणामुळे असुरक्षतेची भावनानिर्माण झालेली आहे. वरील तिघही कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आज रोजी फार मोठे संकट कोसळलेले आहे. वरील तिघही कार्यकर्त्यांचे जिवन उध्दवस्त होण्याची शक्यता आहे. अत्यंत महत्वाचे की, देशात अनेक नेत्यांवर ‍ निषेद म्हणुन शाई फेकण्यात आलेली आहे. पंरतु त्यावेळी सदर आंदोलकांवर अशी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याची एकही नोंद नाही. मात्र पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारे निषेध नोंदविणा-या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची पहिलीच वेळ असुन यावरुन असे दिसुन येते की, वरील तिघही कार्यकर्ते हे आंबेडकरी ‍ विचारसरणीचे असल्याने निव्वळ जातिय व्देशभावनेतुन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.अशा प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर दबावपोटी खोटे गुन्हे दाखल करुन लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे.

         निवेदनकर्त्यांनी वरील तिघही कार्यकर्त्यांवरील दाखल झालेली खोटी गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने यापुढेही आंदोलन करण्यात येईल.याची शासनाने नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन दिले.

 प्रत रवाना :-म.राज्यपाल सो,महाराष्ट्र,म. मुख्यमंत्री सो, महाराष्ट्र, म.गृहमंत्री सो, महाराष्ट्र,म. विरोधीपक्ष नेते सो, महाराष्ट्र या निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आहे.

        सदर निवेदनावर ॲड.योगेश गजरे, राजेंद्र अटकाळे, पंकज वाघ, बाळु शिरतुरे,धनराज घेटे, जितेंद्र ढिवरे, हिरामण गाढे, राजेंद्र पानपाटील, अमर तायडे, बाळु तायडे, संघरक्षक तायडे, नगीन तायडे, कंदरसिंग बारेला,दिलीप तायडे, जगदीश कोचुरे, महेश तायडे, उमेश गाढे, सचिन तायडे, नरेश गजरे, हर्षवर्धन तायडे, संदिप सवर्णे, गणेश सवर्णे, किरण सवर्णे यांच्यासह रावेर तालुक्यातील  असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!