ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
दिनांक ०९ डिसेंबर रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील,व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.[ads id="ads1"]
बरेच दिवसांपासून बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणीव पूर्वक अवमान करण्याच्या घटना घडत आहेत महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असतांनाच या वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण बहुजन समाजातून निषेध व्यक्त होत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. ०९/१२/२०२२ रोजी पैठण येथील आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून अनुदान मागीतले नाही तर भिक मांगून शाळा सुरू केल्या आहेत अशाप्रकारचे वक्तव्य करून तमाम बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जाणीव पूर्वक महापुरुषांचा अवमान करून सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी व सामाजिक तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आंदोलन उभे करण्यात येईल.[ads id="ads2"]
तसेच भिमसैनिक मनोज गरबडे यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रावेर युवा तालुका अध्यक्ष जितेंद्र रविंद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निषेध निवेदन देण्यात आले या निवेदनावर जितेंद्र इंगळे, सुमेध सवर्णे,अजय तायडे,मयुर तावडे,श्रावण भालेराव,राजरत्न भालेराव,शरद भालेराव, अतुल भालेराव,अमर भालेराव,अजय गाढे, अविनाश सवर्णे, सुमित भालेराव,आशितोष भालेराव,अमन भालेराव,अर्जून भालेराव,सागर म्हसाने,आरीफ खान, रविंद्र इंगळे,संजय खिरवडकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.



.jpg)