नाशिक ( मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील आशा व गटप्रवर्तक यांनी आज दिनांक 12 डिसेंबर 2022 सोमवारपासून पंचायत समिती त्रिंबकेश्वर येथे बेमुदत मुक्कामी आंदोलनास सुरुवात केली असून जोपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना ग्रामसेवक मे 2020 चे संपूर्ण पैसे किंवा चेक घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आशा व गटप्रवर्तक यांनी म्हटले आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोनाच्या महामारी या प्रचंड विनाशकारी आसताना सुद्धा या आजारापासून जनतेला वाचविले व त्यासाठी अतोनात काम केले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मार्च 2020 मध्ये एक जीआर काढून प्रोत्साहन भत्ता दर महिन्याला एक हजार रुपये कोरोना काळ संपेपर्यंत देण्याची जाहीर केले होते. परंतु ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी फक्त एप्रिल 2020 मध्येच एकदा एक हजार रुपये दिले होते. [ads id="ads2"]
मात्र त्यानंतर पैसे दिलेच नाही. वारंवार पत्रव्यवहार करून देखील पैसे मिळालेच नाही. शेवटी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 17 जून 2019 रोजी सर्व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांना पत्र काढले. या पत्रामध्ये म्हटले होते की आशा व गटप्रवर्तक यांना पैसे देण्यात यावे असे म्हटले होते. परंतु त्यानंतर देखील पैसे मिळालेच नाही .
त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी आज सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 पासून पंचायत समिती त्रंबकेश्वर येथे मुदत मुक्कामी आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांना ग्रामसेवक मी 2020 चे संपूर्ण पैसे चा चेक येत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलन सुरूच राहील.
त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील एका जरी आशा किंवा गटप्रवर्तक यांचा चेक बाकी राहिला तरी आंदोलन सुरूच राहील ही भूमिका घेऊन हे वीरभूत मुक्कामी आंदोलन करत आहोत असे आशा व गटप्रवर्तक यांनी पवित्रा घेतला आहे.
सिटु सलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन चे नेते कॉम्रेड विजय दराडे, कल्पना शिंदे, संगीता भोये, पद्ममा महाले,पुष्पा शिंदे धनंजया बोरसे, मीरा अवतार, कल्पना राऊत, मनीषा गायकवाड, अलका तुंगार, वनिता भोये तसेच दोनशे आशा व गटप्रवर्तक यांची आंदोलन स्थळी उपस्थिती आहे.



