रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)- तेली समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी प.पु.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रावेर तेली समाजा तर्फे दि. २१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी समाज बांधव व भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रावेर तेली समाजातर्फे करण्यात आले आहे. [ads id="ads1"] संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. २१ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजता तेली पंच भुवन, विखे चौक रावेर येथुन महाराजांच्या मुर्तीची सजविलेल्या पालखीतुन टाळमृदुंगाच्या गजरात शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, भोई वाडा, महात्मा गांधी चौक, डाॅ हेडगेवार चौक (चौराहा), मेन रोड, महाराजा अग्रसेन महाराज चौक, पाराचा गणपती, तेली पंच भुवन मार्गे मिरवणुकीची तेली समाज नियोजित मंगल कार्यालय जागा, राजे छत्रपति शिवाजी महाराज चौक, श्रीकृष्ण गौशाळे जवळ येथे सांगता होईल. [ads id="ads2"]
नंतर तिर्थप्रसाद व भंडारा कार्यक्रमाचे आयोजन त्याच ठिकाणी करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास समाज बांधव व भगिनी यांनी मोठ्या संख्येनेे उपस्थित रहावे असे आवाहन तेली समाज पंच मंडळ, समस्त तेेली समाज बांधव, युवक वर्ग व महिला मंडळ, रावेर यांनी केेेलेे आहे.


