धरणगाव प्रतिनिधी- पी.डी. पाटील सर
धरणगांव - येथील शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.सकाळ सत्रात वाय. पी.पाटील व डी.एन.चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. [ads id="ads1"]
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील उपस्थित होते. दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण केलेत. विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवन कार्याबाबतीत सकाळ सत्रात आर.एम.चौधरी तर दुपारच्या सत्रात किशोर चौधरी यांनी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख कैलास माळी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.


