रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृती निमित्ताने प्राचार्य डॉ जे बी अंजने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी लोकशाहीत मतदान करणे खुप महत्वाचे असते म्हणून सर्वांनी मतदार यादीत आपल्या नांवाची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन केलेे.[ads id="ads2"]
या प्रसंगी मतदार नोंदणी फॉर्म चे वाटप करण्यात आले.भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बाविस्कर यांनी केले. या वेळी प्रथम वर्ष विज्ञान शकला वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


