रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी) रावेर तालुक्यातील विटवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात ६६व्या महानिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरानां अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी व उपसरपंच चेतन पाटिल , यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.[ads id="ads1"]
या प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े यांनी प्रस्ताविक केले तर आभार ग्रामसेवक मंगेश पाटील यांनी केले यावेळी ग्रा.पं. सदस्य सुरेश कोळी, मुकेश चौधरी, गणेश मनुरे, गजानन कोळी, पोलिस पाटील बाळु पवार, बाळु मनुरे, मिथुन वानखेड़े शिपाई नयन जैन व गावातील गावकरी उपस्थित होते.


