ऐनपूर ग्रामपंचायत मध्ये महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानवास अभिवादन तसेच जागतिक अपंग दिवस साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  

  रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी

    महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने बापूराव काने उत्तर महाराष्ट्र दिव्यांग अध्यक्ष रामदास खोत साहेब उत्तर महाराष्ट्र दिव्यांग महासचिव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने आज सहा डिसेंबर  रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधानाचे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.[ads id="ads1"] 

   त्यानंतर 6 डिसेंबर जागतिक अपंग दिवस ऐनपुर ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला त्या ठिकाणी प्रथम दिव्यांग बांधवांसाठी जीआर मधील योजना चे प्रास्ताविक ग्रामसेवक गोसावी आप्पा यांनी माहिती दिली.

     जागतिक अपंग दिनानिमित्त जीआर मधील विषय खालील प्रमाणे घेण्यात आले.

1) दिव्यांग बांधवांना 2013 आणि 2016 च्या जीआर नुसार

ग्रामनिधी वसुली मधून पाच टक्के रक्कम देण्यात देण्यात यावी.

2) तसेच दिव्यांग बांधवांना जी आर नुसार 50% घरपट्टी माफ असावी.

3) दिव्यांग बांधवांना शासनाच्या जीआर नुसार व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फुट जागा ग्रामपंचायतीने तातडीने उपलब्ध करून द्यावी.

4) तसेच 15 व्या वित्त आयोगातून शासनाच्या जीआर नुसार सामूहिक दिव्यांग बांधवांना वाचनालय किंवा सामूहिक खोली बांधून मिळावी.

5) तसेच दिव्यांग बांधवांना पंधराव्या वित्त आयोगातून व्यवसायासाठी लागणारी रक्कम धन राशीच्या स्वरूपात 40% च्या वर महाराष्ट्र शासन पणजीकृत केलेल्या सर्टिफिकेट यांना समसमान अदा करण्यात यावी.[ads id="ads2"] 

अशी तरतूद प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्री सुरेश दादा पाटील तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे अध्यक्ष विनोद कोळी

उपाध्यक्ष जितेंद्र कोळी यांनी ग्रामसेवक गोसावी आप्पा तसेच सरपंच अमोल भाऊ महाजन यांना सांगितले वरील योजनांपैकी ऐनपूर ग्रामपंचायतीने सर्व दिव्यांग बांधवांना 5% ग्रामनिधी तसेच 50% घरपट्टी माफ चे फायदे दिलेले आहेत अशोक गोसावी आप्पा ने सांगितले. तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी पुढील महिन्यात प्रत्येकी आठ आठ हजार रुपये दिले जातील असे सांगितले

त्याबद्दल प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी ग्रामसेवक गोसावी आप्पा आणि सरपंच अमोल भाऊ महाजन यांचे आभार व्यक्त केले. त्या ठिकाणी उपस्थिती म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा पाटील प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष विनोद कोळी तालुका उपाध्यक्ष जितेंद्र कोळी तालुका संघटक विश्वनाथ भिल्ल तालुका खजिनदार महिंद्र भोई शाखा अध्यक्ष संजय मावळे प्रहार दिव्यांग सदस्य कल्पना लोहार, सरपंच अमोल भाऊ महाजन ग्रामसेवक गोसावी आप्पा तसेच सदस्य गणेश पाटील बाळू भिल्ल योगेश महाजन बबलू अवसरमल किशोर पाटील अनिल जैतकर पृथ्वी जैतकर अरविंद महाजन तसेच पत्रकार विजय अवसरमल इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!