नाशिक (मुक्ताराम बागुल)
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सर्व मानव जातीच्या उद्धारासाठी संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनाची महानायक ठरले असल्याचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र युवा नेते वंदेशजी गांगुर्डे त्यांनी बोलताना म्हटले आहे.[ads id="ads1"]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विश्व भूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार उत्तर महाराष्ट्र युवा नेते वंदेशजी गांगुर्डे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बसणंटंटघघंष ढ प्रसंगी युवा नेते गोरख चौधरी, अनिलशेठ गुंदेचा, संजयशेठ मुनोत, राजेंद्र धिवर, नाझभाई शेख, दिलीपशेठ बरडिया आदींसह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते


