यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद व्यापारी संकुलनात सरकारमान्य 'ताडी' विक्री केंद्र आहे या 'ताडी' विक्री केंद्रातून आरोग्यास हानिकारक आणि ताडी पिणाऱ्यांना नशा अधिक व्हावी म्हणून क्लोरोफॉर्म इत्यादी आरोग्यास घातक रासायनिक गोळ्या मिसळून विक्री होत असल्याने 'ताडी' पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे यावल शहरासह परिसरातील अनेकांचा मृत्यू झाल्याने समाजात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.[ads id="ads1"]
आयुर्वेदिक औषध म्हणून ताडीचा उपयोग होत असतो सकाळी आठ वाजेपूर्वी रस घेतला तर तो आरोग्यास लाभकारक असतो मात्र जस जसा उशीर होतो तसे त्यात अल्कोहोलचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढत जाते असे ताडी मागील शास्त्र आहे.[ads id="ads2"]
तालुक्यात किमान ताडीची हजार झाडे असतील तरच स्थानिकांना ताडी विक्रीचा परवाना दिला जातो असा नियम आहे, परंतु आज पर्यंत यावल तालुक्यात ताडीचे एक सुद्धा झाड नसताना तसेच 'ताड' आणि 'सिंदी' ची झाडे लावण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा व तालुका, विभागीय स्तरावरील उत्पादन शुल्क विभागामार्फत कोणतेही प्रयत्न तालुक्यात केलेले नसताना यावल शहरात शासनमान्य 'ताडी' विक्री केंद्र परवाना कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या अधिकाऱ्याने कोणाच्या दडपणाखाली दिला हा संशोधनाचा भाग असून यावल शहरात शासनमान्य 'ताडी' विक्री केंद्रास परवाना देणारा अधिकारी मात्र आता अडचणीत येणार असल्याबाबत यावल तालुक्यात देशी विदेशी दारू विक्रेते व बिअर बार चालक-मालक यांच्यात बोलले जात आहे.
ताडी विक्री केंद्र यावल नगरपरिषद व्यापारी संकुलनात आहे या दुकानाचा नगरपालिकेची झालेला करारनामा आणि दुकान त्रयस्थ इसमाला पुन्हा करार करून दिला असल्याने याबाबत सुद्धा कायदेशीर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.


