प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने विटवे ग्रामपंचायत मध्ये जागतिक अपंग दिवस साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)

                                           प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक , अध्यक्ष" माननीय माजी राज्यमंत्री आमदार श्री, बच्चुभाऊ कडू .यांच्या विचाराने प्रेरित होऊन , तसेच प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी. यांच्या अध्यक्षते खाली प्रहार दिव्यांग संघटना क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, माननीय बाळासाहेब पाटील. यांचे मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार 16 डिसेंबर रोजी विटवा तालुका रावेर, ग्रामपंचायत मध्ये जागतिक दिव्यांग क्रांती दिवस साजरा करण्यात आला.  [ads id="ads1"]  

 प्रथम प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष श्री, विनोद हरी कोळी .यांनी सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचे 5 % निधी लवकरात लवकर देण्यात यावे असे ग्रामसेवक यांना सांगितले. त्यानंतर दिव्यांग बांधवांच्या योजना समजावून सांगितल्या. तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू अशी ग्वाही दिली. आणि सर्वांचे आभार व्यक्त केले.  [ads id="ads2"]  

  तसेच दिव्यांग बांधवांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ ,यांच्या 25 वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे( दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयात) मंजुरी मिळाली. अशा दिव्यांग बांधवांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल माननीय माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांचे दिव्यांग बांधवांना तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच तीन डिसेंबर या रोजी मुंबई विद्यापीठ येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाचे उद्घाटन करण्यात आले. दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय झाल्यावर सर्व दिव्यांगांना पुरेपूर योजनेचा लाभ मिळेल अशी ग्वाही प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांनी दिली. त्यानंतर ग्रामसेवक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की, आम्ही दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर 5 % निधी त्यांना देऊ असे सांगितले. त्यानंतर त्यांचे आभार प्रहार जनशक्ती पार्टी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री, सुरेश चिंधू पाटील यांनी व्यक्त केले .तसेच प्रहार अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष श्री, वसीम भाऊ. यांनी माजी उपसरपंच सुरेश भाऊ कोळी, यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील 'या' 140 ठिकाणी 18 व 20 डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी ; जिल्हा प्रशासनाचा आदेश 

   त्याप्रसंगी उपस्थित प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, श्री सुरेश दादा पाटील .प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी. प्रहार जनशक्ती पार्टीचे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वशीम भाऊ, प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष जितेंद्र कोळी, दिव्यांग उपाध्यक्ष शशिकांत पाटील, तालुका संघटक आनंदा कोळी, तालुका सचिव भागवत शेलोळे ,सुलवाडी शाखाध्यक्ष गोपाल कोळी, अजंदा शाखाप्रमुख मुरलीधर पाटील, दिव्यांग तालुका सह संघटक विश्वनाथ भिल्ल, ऐनपुर शाखाप्रमुख संजय मावळे, कैलास मनुरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच रीना ताई कोळी, सांगवे समाधान कोळी, सांगवे दशरथ अडागळे ,इत्यादी दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!