नाशिक (मुक्ताराम बागुल) भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली येत्या 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर दुपारी दोन वाजता दम मेळाव्याची आयोजन करण्यात आल्याने, या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्ह्यातून ठिकठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा सक्रिय झाली असून त्यातच मनमाडच्या शहराध्यक्ष आम्रपाली निकम यांनी देखील एका पत्रकाद्वारे हितचिंतकांनी सदरच्या धम्म मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.[ads id="ads1"]
सदर पत्रकामध्ये म्हटले आहे की , भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय सल्लागार तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे या मेळाव्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज देखील उपस्थित असणार आहे.[ads id="ads2"]
नाशिक येथे होणाऱ्या धम्म मेळाव्यासाठी भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, रेखाताई ठाकूर, अशोक सोनाने , दिशा पिंकी शेख यांची प्रमुख उपस्थिती असणारा असून या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देखील मनमाड येथील मनमाड शहर अध्यक्ष आम्रपाली निकम यांनी पत्रकार द्वारे आव्हान बरोबरच ऑडिओ क्लिप द्वारे देखील प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक नांदगाव तालुक्यातून नागरिकांकडून केले जात आहे.


.jpg)